नंदिवर्धनमधील उत्खननात वाकाटक राजवंश घराण्यावर प्रकाशझोत
नंदिवर्धनमधील उत्खननात वाकाटक राजवंश घराण्यावर प्रकाशझोत | eSakal येथील पुरातत्त्वीय साधनांचा वापर करून सातवाहन वंशज कोण होते, वाकाटक आणि सातवाहन यांच्यामध्ये साम्य होते का वेगळे याचा निष्कर्ष काढला जाणार असल्याची माहिती डेक्कन कॉलेजचे कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांनी दिली. पुणे : नागपूरातील रामटेक येथे प्राचिन नंदिवर्धन या वाकाटक राजवंशाच्या राजधानीचे शहराचे उत्खनन केले आहे. येथील पुरातत्त्वीय साधनांचा वापर करून सातवाहन वंशज कोण होते, वाकाटक आणि सातवाहन यांच्यामध्ये साम्य होते का वेगळे याचा निष्कर्ष काढला जाणार असल्याची माहिती डेक्कन कॉलेजचे कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांनी दिली. या संदर्भात शिंदे म्हणाले, ‘‘डेक्कन कॉलेज पुरातत्त्व विभाग, नागपूर येथील राज्य पुरातत्त्व आणि वस्तु संग्रहालये आणि प्राचिन भारत इतिहास संशोधन यांच्या संयुक्त विद्यमाने वाकाटक दोन वर्षांपासून उत्खनन सुरू होते. सातवाहन वंशजांचा कालखंड इसपूर्व दुसरे व तिसरे शतक आहे. तर वाकाटक राजवंशान इ.स. तिसरे शतक उत्तरार्ध आणि इ.स.पाचवे शतक उत्तरार्ध या दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य प्रदेशातील काही प्रदेशांवर राज्य केले. वाका...