शके १६७६ मधील रहस्यम शिलालेख.

#शके_१६७६_मधील_शिलालेख.
.
शिलालेख म्हणजे दगडावर अथवा शिळेवर कोरून ठेवलेला मजकूर. लिखित मजकूर अनंत कालपर्यंत टिकून रहावा म्हणून तो दगडी शिळेवर कोरून ठेवायची प्रथा आस्तित्वात होती.पुरातत्व शास्त्रात याला पुराभिलेख असे म्हटले जाते.
.
राजकीय, धार्मिक व सामाजिक आणि ऐतिहासिक माहिती मिळविण्याच्या दृष्टीने असे कोरीव लेख अत्यंत उपयुक्त असतात.

शिलालेखातील व्यक्ती नावाच्या आणि अक्षरांच्या वळणावरून त्यांचा काल ठरविता येतो.
.
हा आमच्या गावातील शिलालेख असून याचेही वाचन होणे गरजेचे असे मला व्यक्तिशः वाटते...
.
बिरोबा मंदिरासमोर असलेल्या, आणि कान्होबाच्या माळावर ही अडीज ओळी लेख शिळावर कोरलेला आहे.
.
याचा नक्कीच पाठपुरावा घेण्याचा मी शक्य तितका प्रयत्न करत राहील.
.
नक्कीच माझ्या #रॉयल_रत्नापूर चा काळाच्या ओघात दुर्लक्षित इतिहास पुन्हा उजेडात येईल. यात माझे सहकारी मित्रवर्य यांचाही निश्चितच मोलाचे सहकार्य मिळेल अशी आशा करतो.
.
#सुमित_सरवदे.
#संस्थापक_अध्यक्ष_रॉयल_रत्नापूर

R A SARWADE RESEARCH FOUNDATION RATNAPUR


याचे मी जसेच्या तसे काढलेली नक्कल

रत्नापूर ता. परंडा.जि. उस्मानाबाद निजाम राजवटी खालील असलेले तत्कालीन पलियांडा,प्रत्यंडक, परमधामपूर, प्रकांडपूर, पलिखंड,पालांडा, परिंडा करत आताचे परंडा असे असलेल्या तालुक्यात रत्नापुर येथे ही शिलालेख आहे. शेजारी बिरोबाचे पुरातन मंदिर आहे. काळभैरवनाथाची सोनारी ( माकडाची सोनारी) पासून १० कि.मीवर रत्नापूर- मलकापूर जोडगावे आहेत. (परंडा -पाथरुड रोड)

परंडा हे पुर्वी निजाम सरकारची मोठी राजधानी होती. मुनिमखान औरंगाबादीच्या एका पत्रानुसार मोगल काळात परंडा जिल्ह्यात १९ तालुके व ६२१ गावांचा समावेश होता. सुस्थितीत असलेला येथिल भुईकोट किल्ला अनेक रहस्य आपल्या पोटात घेऊन दिमाखात उभा असल्याचे दिसते.

रत्नापूर येथे जुन्या वाडयांवर अनेक चिन्हे कोरलेली आहेत. परंतु यापेक्षाही जास्त कुतुहल मला येथिल दोन शिलालेखांचेच आहे.

शके१६७६ नाम संवंतर यापुढे मलाही कांही समजेना एकूण १५ते१६ ओळीच एक शीलालेख तर अडीज ओळींची दुसरी शिलालेख कान्होबाच्या माळावर आहे.

या कान्होबाच्या माळावर असलेल्या शिलालेखाचा मी पाहणी करत असलेला सुगावा माझे आजोबा कै. अजिनाथ अर्जुन सरवदे यांना लागताच माझ्यावर रागवले.

जागा चांगली नाही. या त्यांच्या नेहमीच्या उत्तराला मी पुरता वैतागलो होतो.

म्हणून तिथे वारंवार जाऊन त्या दिवशी मी आजोबांना बोलते केले. १४ ऑगस्ट२०१३ ला मी इतिहासाची फक्त आवड असल्यानं पुरावे गोळा करण्याचा छंद जोपासू लागलो.

आजोबांव्यतिरिक्त त्यांच्या समवयस्क लोकांच्या मुलाखतीही मी घेतल्या, रेकॉर्ड केल्या. परंतु दुर्दैवाने प्रवासात कुठेतरी गहाळ झाल्या.

कान्होबाचा माळ

याविषयी आमुचे आजोबा सांगायचे की भावकीतल्या साधू सुदाम सरवदे यांचे मेव्हणे मारूतीबुवा वंजारे,बीड हे जुने शिक्षित, सुसंस्कृत ग्रहस्थ पोथी पुराणे यांचे वाचन करणारे. नित्यनियमित गुजराच्या (गुज्जर) विहिरीवर अंघोळीला जायचे.

एकदा अंघोळ करत असताना त्यांना विहिरीतून कान्होबाच्या माळावर साधारण एक कि.मीचा रस्ता असल्याचे दिसले. शिवाय तसा उल्लेख असलेला मजकूर या विहिरीवर अथवा जवळपास त्यांना वाचायलाही मिळाला.

त्यांनी कान्होबांच्या माळावर गेल्यावर तिथे एका शिळेवर लिहिलेला मजकूर वाचला तेंव्हा त्यांना जाणवले की तो मजकूर बदलतो आहे. आणि क्षणात ती शिळा पलटी होऊन त्याखाली तळघरात जाणाऱ्या पायऱ्या दिसल्या.

मारूतीबुवा तळघरात गेले. तिथे त्यांना अफाट धनदौलत असलेले मोठ्ठाले हंडे, पेटया दिसल्या, ऋणीमूनी दिसले. शिवाय दोन स्त्रिया ज्यांची नावे रत्निका ( रत्ना ) आणि मल्लिका स्वागत करताना दिसल्या.

मारूतीबुवा आणि त्यांच्यात संवाद झाला. मारूतीबुवा अत्यंत भयभित होऊन अंघोळ केली नसल्याचे शिवाय मटन खाल्याचे कारण सांगून त्या तळघरातून बाहेर आले.

पुढे सहा महिने ते आजारी पडले. आणि रक्ताची गुळणी (उलटी) होऊन मरण पावले. विशेष म्हणजे या गोष्टीला गावातले आजोबांच्यावयाचे सर्वजण दुजोरा देतात.

निश्चित कोणती शिळावरील लेख मारूतीबुवा यांनी वाचला हे सांगता येणार नाही परंतु मी स्वतः तिथे पाहिले तेंव्हा अडीज ओळी असलेला दगड आढळला. शिवाय तो आम्ही दोघांनी उचलूनही पाहिला ना रस्ता ना तळघर.

हाच तो दगड

माझी खुप इच्छा होती यावर योग्य ते संशोधन व्हावे. परंतु या अनाकलनीय भाषेचा अडसर मध्ये येत होता. गावाचा इतिहास डोळयांपुढे असूनही वाचता येत नाहीय याचेच वाईट वाटते.

सहकार्य अपेक्षित.

आपलाच,

सुमित रवि सरवदे.

8888421431 वॉटसप करा

Comments

Popular posts from this blog

मुलुख मैदान या तोफेचा युद्धामध्ये किती वेळा वापर करण्यात आला आहे?

आसफ़ जाही राजवंश