मुलुख मैदान या तोफेचा युद्धामध्ये किती वेळा वापर करण्यात आला आहे?
मलिक-इ-मैदान तोफ (फारसी शब्द-अर्थ:मैदानाचा राजा).आज जरी ती तोफ आदिलशाहीची म्हणून ओळखली जात असली तरी या तोफेचा जन्म मूळ निजामशाहीमध्ये झाला.१५४९ साली बुर्हान निजामशह याचा तोफखान्यावरील तुर्की अधिकारी चलबी रुमीखान दखनीयाने ही तोफ अहमदनगर येथे बनवली.रुमीखान हा मूळचा तुर्कस्तानचा.मलिक-ए-मैदान तोफेच्या निर्मिती च्या वेळी म्हणजेच सोळाव्या शतकात ती जगातील सगळ्यात मोठे शस्त्र होती.अहमदनगर येथे ज्या मुशीतून या तोफेची निर्मिती करण्यात आली ती जागा आजही प्रसिद्ध आहे.
तोफेचा धमाका एवढा मोठा होता की बत्ती देणारा सैनिक मरण्याची शक्यता असल्याने शेजारीच एक पाण्याचा हौद बांधलेला आहे, जेणेकरून बत्ती दिली रे दिली की हौदात उडी मारुन पाण्यात बुडी मारुन बसायचे कारण पाण्यात लपल्यामुळे आवाजाचा हादरा कमी बसे हा त्यामागचा हेतू !
ही निजामशाही काळात अहमदनगर येथे इ.स. १५४९ मध्ये तयार केलेली तोफ आहे. हिला मलिक मैदान तोफ किंवा मुलुख मैदान तोफ या नावानेही ओळखले जाते. या तोफेचे वजन ५५ टन असून निजामशाहीतील राजा बुर्हाणशहा याच्याकडे काम करीत असलेला तुर्की सरदार रुमीखान दख्खनी याने तांबे, लोखंड व जस्ताच्या मिश्रणातून अहमदनगर येथे ही तोफ गाळली होती.या तोफेचे तोंड मगरीच्या उघडलेल्या जबड्यासारखे आहे. मलिक मैदान तोफेची लांबी १४ फूट ४ इंच असून तिचा व्यास ४ फूट ११ इंच आहे. निजामशाहीच्या उत्तरार्धात ही तोफ अहमदनगर येथून परांड्याच्या किल्ल्यावर व नंतर दक्षिणेत नेण्यात आली. सध्या ही तोफ विजापूर किल्ल्याच्या शाह बुरुजावर ठेवण्यात आलेली आहे.मलिक-ए-मैदान " ही तोफ निजामशाहच्या प्रसिद्ध तोफखान्याचा एक भाग होता.या तोफेबरोबर नौ गजी,लैला-मजनू,हवाई,तोप-ए-हैदरी या आणि अशा बऱ्याच तोफा निजामशाहच्या तोफखान्यात होत्या.
तुर्की सरदार रुमीखान दख्खनी याने तांबे, लोखंड व जस्ताच्या mixture मधून अहमदनगर येथे ही तोफ गाळली होती. उत्तरार्धात ही तोफ अहमदनगर येथून परांड्याच्या किल्ल्यावर व नंतर दक्षिणेत नेण्यात आली. सध्या ही तोफ विजापूर किल्ल्याच्य बुरुजावर ठेवण्यात आलेली आहे
सिंहाच्च् जबड्यानेला हत्ती असे शिल्प त्यावर कोरून ठेवलेले आहे.
१५५९साली .पोर्तुगीजांनी काही निमित्ताने रेवदंड्याचा किल्ला जिंकला केला होता.निजामशाहनं त्याकाळी मुहम्मद आणि रुमीखानाची पोर्तुगीजांच्या विरुद्ध मोहीमे साठी पाठवणी केली. या दोघांनी " मलिक-ए-मैदान" सह आपला जंगी तोफखाना कोकणच्या दिशेने रवाना केला.तोफखाना जसा पुढे सरकू लागला तसे पोर्तुगीजांचे धाबे दणाणले त्यांनी तह करत " आपण कोकणात निजामशाहीचे अंकित बनून राहू " असे जाहीर केले.नुसते मलिक मैदांचे नाव ऐकून त्यांनी शरणागती पत्करली.
१५६२ साली हुसेन निजा म आणि कुतुबशाह याची युती झाली.करार झाले.आणि पुढे या संयुक्त फौजांनी कल्याणीच्या किल्ल्याला वेढा दिला.करण निजामा कडील दाबजोर तोफ खाना.निजामाला आपल्या तोफखान्यावर भरवसा होता.७०० तोफांच्या गराडयात संयुक्त फौजांची छावणी निर्धास्त होती.
आदिलशाहला खबर मिळाली की निजामशाह व कुतुबशाह यांनी मिळून कल्याणीचा किल्ला वेढला आहे
आदिलशाहनं बुऱ्हाण इमादशाह,अली बरिदशाह आणि विजयनगरच्या रामराजाची मदत घेऊन कल्याणीच्या दिशेने कूच केली.
पण या लढाईत संयुक्त फौजांची मोठी पंचाईत होणार होती.कारण त्यांनी जी छावणी केली होती ती काळ्या मातीत केली होती.हे त्यांच्या लक्षात आलं नाही.आणि त्यात त्यांच्यावर निसर्गाची अवकृपा झाली.
आदिलशाहच्या सैन्यानी जसा हल्ला चढवला तसा काही वेळात पाऊस सुरू झाला.सगळा तोफखाना चिखलात रुतून बसला.अशा परिस्थितीत पहिली कच खाली कुतुबशाहनं.हा सगळा प्रकार बघीतल्यावर कुतुबशाहनं प्रथम काढता पाय घेतला.त्यामुळे निजाम हतबल झाला
त्याला सुध्दा माघार घ्यावी लागली.७०० तोफांन पैकी फक्त ४० तोफा बरोबर घेऊन निजामान माघार घेतली.
इतिहासकारांच्या नुसार मते,याच दरम्यान मलिक-ए-मैदान तोफही आदिलशाहच्या हाती लागली.
आता निजामा,कुतुबशाही आणि आदिलशाह हे एक झाले.ज्या आदिलशाहला रामराजानंमदत केली होती.त्यावरच या तीन जणांनी त्यांच्या विरुद्ध आघाडी उघडली.हीच ती तालिकोटची लढाई
१५६५ साली झालेल्या लढाईत मात्र मलिक-ए-मैदान या तोफेन कमालच केली.बहुदा याच वेळी आदिलशाहनंया मलिक-ए-मैदान सह ६०० इतर तोफा मिळून ३ पदरात त्याची सांगड घालून २०० गाडे एक ओळीत उभे केले.या सर्वच तोफांवर निजामाचे जुना अधिकारी म्हणजे चलबी रुमीखान हा सर्वांवरच नियंत्रण ठेवून होता.आणि विशेष म्हणजे या सर्व तोफांना २००० च धनुर्धारी पथकांच संरक्षण दिलं होतं
युद्धाच्या गर्दीत रामराजाच पायदळ घेमार करीत खोलपर्यंत गुसल ते पार त्यांनी निजामाचा तोफ खाना बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली.त्यावेळी निजामाने रुमीखानास हुकूम दिला की
" मुलुख मैदान तोफेमध्ये खुर्दा ( तांब्याची नाणी )ठासून भरा आणि ती रामराजाच्या सैन्यावर उडवा."
रुमीखाना धन्याचा हुकूमवरून खुर्दा उडवला पहिल्या फेरीतच रामराजाच ५००० सैनिक मरण पावले.
नंतर अशा २-३ फेऱ्या झाल्या त्यात बरचंस सैन्य गारद झालं असावं..दख्खनच्या भूमीवरून अखेरचा हिंदू सत्तेचा अंमल नाहीसा झाला.त्याच वेळी आदिलशाह ने निजामाला तोफखाना परत केला त्यात ही तोफ पण परत गेली.
ही तोफ अजूनही तिथेच आहे, तोफ पंचधातूची आहे, एकुण वजन ५५ टन ! इंग्रजांनी तोफ घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता, अति वजनामुळे तो फसला ! आणि तेव्हा पासून तोफ तिथेच आहे.
पुढे निजामशाही ही चांद सुलतान उर्फ चांदबीबी हिच्या हातात सत्ता होती.१५९३-९७ च्या सुमारास मुघल बादशहा अकबर यान सुलतान दानियाल याला चांद सुलतानवरील मोहीमेवर नामजद केले.त्याची फौजेन नगरच्या किल्ल्याला वेढा दिला.दक्षिणच्या इतिहासाची नायिका असणाऱ्या या राणीने यावेळी इतिहासाची पुनरावृत्ती केली.हुसेन निजामशाहन तालिकोटच्या युद्धात तोफेतून तांब्याची नाण्याचा मारा केला होता.पण चांद सुलतानन एक पाऊल पुढे टाकून,मोघली सैन्यावर रुप्याची नाणी उडवली.यातील काही नाणी सैन्याला गोळ्यांप्रमाणे लागली तर काही सैन्याच्या छावणीभोवती पडली.ही नाणी गोळा करण्यासाठी बुणग्यांनी भलतीच गर्दी केली आणि फौजेत पण गडबड उडाली.यामुळे दानियाल सुलतानाला काही काळ वेढा उठवून त्याने माघार घेतली.[1]
पुढे १६०३ साली चांदबीबीचा स्वतःच्या सरदारांनी खून केला.नंतर मलिक अंबर आणि मियां राजू दख्खनी या सरदारांचे दरबारात वर्चस्व वाढले.निजामशाहीत पुन्हा सरदारांच्या लथाळ्या सुरू झाल्या याच दरम्यान सुलतान दानियान पुन्हा नगरवर हल्ला चढवला.या हल्ल्यामुळेनिजामाला आपली राजधानी नगर हुन परांडा किल्ल्यावरहलवावी लागली.याच दरम्यान मलिक-ए-मैदान तोफ ही परांडा किल्ल्यावर आणली.परत मुघल आणि निजामाचातह झाला.परत निजामाने आपली राजधानी जुन्नर येथे हलवली.पण मलिक-ए-मैदान तोफमात्र परांडा किल्ल्यावरच राहिली.
मुघलांकडून या दरम्यान आझमखानया सरदाराने परांडा घेण्याचा बराच प्रयत्न केला.पण तो अयशस्वी झाला.मात्र यावेळी आदिलशाहची मर्जी परांडा किल्ल्यावर बसली.आदिलशाहन मुरार जगदेवयासी कामाला लागण्याचे आदेश दिला.मुरार जगदेव यांनी काम चोख केलं.किल्लेदार आका रिझवान याला बरोबर वंश केलं आणि १० हजार होन देऊन व त्याचीहैबतराव ही पदवी कायम राखून परांडा किल्ला पदरात पाडून घेतला.ते ही रक्ताचा एक थेंबही न सांडता.सुमारे ५० वर्ष निजामशाहच्या ताब्यात असलेला परांडा
आदिलशाहच्या ताब्यात आला.मुरार जगदेव यांनी त्वरित परांडा किल्ल्यावरच्या महत्त्वाच्या तोफा विजापूरास हलविण्याचा घाट घातला. यात दोन महत्त्वाच्या तोफा होत्या एक मलिक-ए-मैदान,आणि दुसरी धूळधाण.पावसाळा असल्यानं त्यांना या तोफा नेणे अवघड गेले
त्यात भीमा नदी पार करताना त्यातील एक तोफ धूळधाण भीमेत बुडाली.मात्र मलिक-ए-मैदान सुखरूप बाहेर काढली.२२ ऑगस्ट १६३२ रोजी ती विजपुरात दाखल झाली.८सप्टेंबरला तिला मुख्य बुरुजावर ठेवण्यात आले.या बुरुजावर चडवताना १०हत्ती आणि ४०० बैल ही तोफ ओढत होते.कारण तीच वजन सुमारे ५५ टन आहे.तिची लांबी १४ फूट ४ इंच असून तिचा व्यास ४ फूट ११ इंच आहे.
पुढे दिल्लीचा औरंग्या आला त्यांन आदिलशाही बुडवली
त्याला वाटलं तोफ दिल्लीला न्यावी.पण तोफ बघीतल्यावर त्याला घाम आला.मग त्याने त्यावर शिलेख कोरण्याच ठरवलं. " ही मैदान गाजवणारी प्रचंड तोफ आता आलमगिरान जिंकून घेतली आहे " अस त्यावर कोरण्यात आले.
आज तोफेवर दोन शिलालेख आहेत.एक रुमीखान यान
तोफ बनवतानाचा आणि दुसरा औरंग्याचा.
...................................................................................
मलिक ए मैदान तोफ म्हणजेच युद्धभूमीचं सुलतान ! या तोफेचं दुसरं नांव मुलुख मैदान तोफ असं ही आहे. आज काल सभेत जोरदार भाषण करणाऱ्याला मुलुख मैदान तोफ असे संबोधतात ते याचं तोफे वरून
१५४९ साली अहमदनगरच्या परांडा किल्ल्यावर निजामशाहीतील सरदार रुमीखान दख्खनी याने तांबे, लोखंड व जस्ताच्या मिश्रणातून ही तोफ बनवली. आजही या तोफेला गंज चढला नाही. पुढे इब्राहीम आदिलशहा च्या काळात ही तोफ विजापूर येथे आणण्यात आली. हिची क्षमता ७००mm कॅलिबर इतकी आहे.
भारतातली सर्वात मोठी तर जगातली पाच नंबर ची ही तोफ आहे. जेवढी मोठी तोफ तेवढीच मोठी तोफेची आख्यायिका. तर या मलिक ए मैदान तोफे बद्दल ची सर्वात प्रसिद्ध आख्यायिका ही की ही या तोफेचा आवाज एवढं मोठा होता की तोफ डागल्याच्या आवाजाने गर्भवती बायका बाळंत व्हायच्या.
अगदी विश्वास ठेवाव अशीच ही अफवा आहे कारण या तोफेचा आव्वाज खरच खूप मोठा होता. तोफ डागणाऱ्याचं सरंक्षण व्हावं म्हणून त्या काळात तोफे जवळ एक पाण्याने भरलेला हौद बांधण्यात आला होता. तोफेची बत्ती पेटवल्यावर सैनिक या हौदात उडी घ्यायचे. नाही तर त्यांच्या कानाचे पडदे फाटण्याची शक्यता असायची.
मलिक ए मैदान तोफे बद्दलची आणखी एक आख्यायिका म्हणजे ही तोफ ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनी भारत विजयाचे प्रतिक म्हणून राणीला भेट देण्यासाठी इंग्लंडला नेणार होते. पण ५५ टन इतकी जड असलेली तोफ नेणे त्यांना शक्य झाले नाही.
विजापूरच्या आदिलशहाचा दिवाण मुरार जगदेवने १० हत्ती आणि ४०० बैलांच्या साह्याने ५५ टन वजनाची ही तोफ विजापूरला नेली. त्यापूर्वी नगरचा दिवाण मलिक अंबरने सोलापूरवर तिचा वापर केला होता.
जगातील सर्वात जबरदस्त तोफांपैकी कोणाला मोजले जाते. तोफ कुठे आहे हे माहित आहे ... - तोफाचे नाव मालक-ए-ग्राउंड आहे, जो कि बीजापूरमधील ऐतिहासिक शहर म्हणून ओळखला जातो. - मध्ययुगीन काळामध्ये तो सर्वात मोठा तोफा होता.
- ते 55 टन वजनाचे आहे, तर लांबी 14.6 फूट (4.45 मीटर), बाह्य व्यास 4.9 फूट (1.5 मीटर) आहे.
- 16 व्या शतकात तालिकोट युद्धाच्या विजयानंतर बीजापुर शासक इब्राहिम आदिल शाह दुसरा याने स्थापना केली. ही बंदूक बुर्ज-ए-शरीफवर ठेवली गेली आहे - हा तोफ अद्याप बीजापूरमधील बुर्ज-ए-शरीफच्या टॉवरवर आहे.
- बुर्ज-ए-शरीफ म्हणजे सिंहांची बुरुज. हा किल्ला आदिल शाही सल्तनत दरम्यान बांधण्यात आला होता.
- या तोफवर अशी रचना केली गेली आहे की सिंहाने जबडा उघडला आहे.
यामध्ये, दोन बाघांनी तीक्ष्ण दात काढून टाकताना एक लहान हत्ती दाखविला. या तोफवरील शिलालेखांद्वारे तोफवर काय लिहिले आहे ते दर्शविते की तुर्क हसन रूमीचा मुलगा मुहम्मद याने ते निर्माण केले होते. दुसरा रेकॉर्ड दर्शवितो की तो 15 9 4 मध्ये टाकला गेला. तिसऱ्या अक्षरात, औरंगजेब यांनी लिहिले आहे की मी बोरो-ए-ग्राउंडवर कब्जा केला आहे. जगातील सर्वात जबरदस्त तोफा - 1886 मध्ये कॅप्टन टेलर आणि जेम्स फर्ग्यूसन यांनी लिहिलेली पुस्तक प्रकाशित झाली. हे असे लिहिले होते की मालक-ई-फील्ड हे जगातील सर्वात मोठे बंदूक आहे. - हसन रुमी याने तो तोफा अहमदनगरला आणला होता. त्या वेळी बुरहाल निजाम शाह प्रथम तेथे राज्य करत होते. या सुलतानाने मोठ्या संख्येने मोठ्या शस्त्रे ठेवली. सैन्याने आवाज ऐकून पळ काढला होता
- ही गोष्ट इतकी प्रचलित आहे की तोफा प्रथम विजय नगर जवळ राकस-तांगडीच्या लढाईत वापरला गेला. या लढाईत विजय नगरचा राजा मरण पावला.
मध्यंतरी सोशल नेटवर्कवर तोफ विषयावर चर्चा करताना प्रश्न आला – तोफेतून गोळ्या व्यतिरिक्त इतर वस्तूंचा बार काढता येतो का? किंवा इतिहासात तश्या काही नोंदी आहेत का?
तोफेतून नाणी मारल्याचे वाचनात आले होते. साहजिकपणे माहिती नवीन असल्याने कुणाचाही विश्वास त्यावर बसेना आणि पुरावे देऊन हे सिद्ध करावे असे तज्ञांचे मत होते. मला खात्री होती की हे मी कुठेतरी वाचलेले आहे परंतु नेमके कुठल्या साधनात हे नेमके आठवत नव्हते. गेला सुमारे महिनाभर वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथांचा शोध घेऊन काल अखेर हवी असलेली नोंद मिळाली. सदर घडलेली घटना ही कुठल्या दुसऱ्या – तिसऱ्या तोफेबद्दल घडली नसून भारतातील सर्वात प्रसिद्ध अश्या मलिक-ए-मैदान किंवा मुलुख मैदान तोफेच्या बद्दल घडलेली आहे. १५६५ च्या राक्षसतागडी उर्फ तालीकोटच्या युद्धात हुसेन निजाम शाह यांचा प्रसिद्ध ७०० तोफांचा गाडा लढाईच्या मध्यभागी उभा होता ज्यात ही प्रसिद्ध तोफही उभी होती. राम रायाचे सैन्य वेगाने पुढे, तोफेच्या माऱ्याच्या अलीकडील बाजूस आले. या मुळे उडवलेले सर्व बार हे समोरून आक्रमण करणाऱ्या पायदळ सैन्याच्या पलीकडे पडणार होते. त्यावेळी निजामाचा तोफखान्यावरील प्रसिद्ध अधिकारी चलबी रुमिखान दखनी याला निजामाने हुकुम केला की – “मुलुख मैदान तोफे मध्ये खुर्दा (तांब्याची नाणी) भरून शत्रू म्हणजे राम रायाच्या सैन्यावर उडवावे”. तसे करण्यात आले आणि सुमारे ५००० सैनिक या माऱ्यात मारले गेले. ही घटना त्या युद्धाला कलाटणी देणारी ठरली. तारीख-ए-फिरीश्ता, बसतीन-उस-सलातीन आणि बुर्हान-इ-मासीर या तीनही संदर्भ ग्रंथात ही माहिती आली आहे. त्यांची चित्रे इथे उपलब्ध करीत आहे.
Comments
Post a Comment